बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील तहसील चौक इतका वर्दळीचा झाला की, येथे लहान-मोठे अपघात नेहमीचेच झालेत. दरम्यान काल 19 ऑक्टोंबर च्या रात्री साडेअकरा वाजता ट्रक व ॲम्बुलन्स मध्ये अपघात झाल्याने ॲम्बुलन्स चालक किरकोळ जखमी झाला आहे तर दोन्ही वाहनांना क्षति पोहचली असून ट्रक चालकाने पोबारा केला आहे.
तहसील चौक नेहमीच गजबजलेला असतो.रात्री उशिरापर्यंत या चौकातून वाहने धावतात.काल रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून बस स्थानकाकडे जाणारी ॲम्बुलन्स आणि मलकापूर कडून चिखली मार्गाकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये अपघात झाला.या अपघातात ॲम्बुलन्स चालक जखमी झाला आहे तर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.










