spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! ‘काका विरुद्ध पुतणी’ने फडकविले बंडाचे निशाण! -डॉ.राजेंद्र शिंगणे विरोधात गायत्री शिंगणेंचा सामना रंगणार! -डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राष्ट्रवादी अजित पवार गटातून आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची शरद चंद्र पवार गटात घरवापसी झाली आहे.त्यामुळे त्यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी बंडाचे निशाण फडकविले असून सिंदखेड राजा मतदारसंघात आता काका विरुद्ध पुतणी असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत.

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी अशी लढाई बघायला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले राजेंद्र शिंगणे परतीच्या मार्गावर असल्याची कुणकुण लागताच गायत्री शिंगणे यांनी बंडाचे संकेत दिले होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर अपक्ष लढणार अशी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती.दरम्यान आमदार राजेंद्र शिंगणे यांच्या शरद पवार गटातिल प्रवेशामुळे आपण
अपक्ष म्हणून लढणार असल्याचे आता गायत्री शिंगणे म्हणाल्यात. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रवेशाला आणि उमेदवारीला शंभर टक्के विरोध असल्याचे देखील त्या म्हणाल्या.
पाच वर्षांपासून मी काम करतेय. पक्ष फुटल्यानंतरही एकनिष्ठेने काम केलंय. बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे काय हाल होते, सगळ्यांना माहिती आहे, असे सांगत गायत्री शिंगणे यांनी बंडाचे संकेत दिले.

▪️कुटुंबातील प्रश्न असला तरी एकत्रित बसून सोडवू ..
आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार गटात प्रवेश घेतल्यानंतर गायत्री शिंगणे आपले विरोधात लढणार असल्याची विचारणा केली असता राजेंद्र शिंगणे म्हणाले की,प्रत्येकाला लोकशाहीने निवडणूक लढायचा अधिकार दिला आहे.त्यामुळे गायत्री शिंगणे निवडणूक लढवू शकतात.आमच्या कुटुंबातील हा प्रश्न असला तरी एकत्रित बसून हा प्रश्न सोडवू काही ना काही मार्ग निघेल,असे राजेंद्र शिंगणे म्हणाले. महाराष्ट्रातील चित्र पाहिलं तर शरद पवारांच्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज असल्याचे शिंगणे म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!