देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) सामाजिक तेढ निर्माण होईल अशी पोस्ट व्हायरल करणाऱ्या एका विरुद्ध देऊळगाव राजा पोलिसांनी आज गुन्हा दाखल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आकाश ज्ञानेश्वर सोनुने रा.संजय नगर देऊळगाव राजा असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी आकाश ज्ञानेश्वर सोनुने याने मोबाईलच्या इंस्टाग्राम आयडी वरील रील वर ”एक समय था जब एक मूल्ले ने पुरे मुंबई को दहशत मे रखा था,अबे हिंदू के नाम से सब मुल्ले कांप रहे है ” अशी पोस्ट करून त्याखाली लॉरेन्स बिश्नोई व बाजूला दाऊद इब्राहिम यांचे फोटो ठेवून ‘धर्मरक्षती रक्षित’ असे लिहिल्याने दोन समाजात तेढ निर्माण होऊन गावातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे.अशा आशयाची तक्रार दाखल झाल्यानुसार आरोपी विरुद्ध कलम 196 (1) BNS 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.










