देऊळगाव साकरशा (हॅलो बुलढाणा/गणेश पाटील) बुलढाणा जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसेसच्या तक्रारी वाढत असताना आज 19 ऑक्टोबर रोजी शाळेच्या 150 च्यावर विद्यार्थ्यांना पोहोचवील्यानंतर बसचे चाक झाले निकामी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.सुदैवाने बस मध्ये कोणी नसल्याने संभाव्य धोका टळला आहे.
देऊळगाव साकरशा तसेच जानेफळ परिसरामध्ये असलेल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना व मेहकर तालुक्यातील खामगाव मेहकर रोडवर असलेल्या शाळेमधील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये सोडण्यासाठी आणि शाळेमधून त्यांच्या गावांमध्ये पोहोचवण्यासाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बस क्रमांक एम एच 27 सी 9314 बसचे चाक निकामी झाले होते. योगायोगाने सदर बस मध्ये विद्यार्थी नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितवास धोका झाला नाही.परंतु आगारातील अनेक बस खिळखिळ्या झाल्या असून दुरुस्तीवर आगाराचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिसून येत आह.त्यामुळे अपघाताच्या घटनेत वाढ होत आहे.परिणामी संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.










