बुलढाणा (हॅलो बुलढाणा ) जिल्ह्यात 9 ते 14 ऑक्टोंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 577 गावांतील 147015.65 हेक्टर पिक पाण्याखाली
गेल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलाय. तब्बल 129511 शेतकऱ्यांना या पिक नुकसानीचा तडाखा बसल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकरी पुरता कोलमोडला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस सुरू असून 11 ऑक्टोंबर रोजी तर जिल्ह्यातील 29 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी,तूर, मका व भाजीपाला पिके पाण्याखाली आले. दरम्यान मोताळा मलकापूर आणि नांदुरा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद सुद्धा झाली आहे. त्यामुळे
मागील 5 दिवसांपासून जिल्हा कृषीविभाग पिक नुकसानीची प्राथमिक माहिती संकलन करत होते. आज 14 ऑक्टोंबर रोजी जिल्हा प्रशासनाला पीकनुकसानीचा अखेर प्राथमिक अंदाज कळविला आहे. यामध्ये जिल्ह्यातील
तब्बल 577 गावांतील 147015.65 हेक्टर पिक उध्वस्त झाले असून याचा तडाखा तब्बल 129511 शेतकऱ्यांना बसला आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून कधी मदत देणारा याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
▪️सर्वाधिक मोताळा व जळगाव जामोद तालुक्याला तडाखा !
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा व जळगाव जामोद तालुक्याला अतिवृष्टीचा तडाका बसला आहे .मोताळा तालुक्यातील सर्वाधिक 116 गावात तर जळगाव जामोद तालुक्यातील 106 गावे बाधित झाले आहे.