बुलढाणा (हॅलो बुलढाणा) धावपळीच्या युगात क्रियाशील नाविन्य हवेच! नव्हे तेच जीवंतपणाचं लक्षण असतं! आणि म्हणूनच यंदा प्रथमच ‘हॅलो बुलढाणा’व कायस्थ कॅटर्सने
जोपासलीय नवरात्रोत्सवात गरबा नृत्याविष्काराची कला-संस्कृती! 9 दिवस सुखासिनतेत रमविणाऱ्या व आदिशक्तीची उपासना करणाऱ्या गरबा महोत्सवाने बुलढाणेकरांना अक्षरशा भुरळ पाडली.महिला व युवतींनी आप-आपल्या हिकमतीने आपली कला मांडली आणि आयोजकांनी त्यांच्यावर लाखों रुपयांच्या बक्षीसांची लयलूट केली आहे.
‘हॅलो बुलढाणा’ व कायस्थ कॅटर्स च्यावतीने आयोजित गरबा महोत्सवात शेवटच्या दिवशी
गरबाची धुंदी एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली होती. रंगीबेरंगी आणि पारंपरिक पोषाखात तरुणाई सजली होती.पूर्ण पेंडॉल रंगीत प्रकाशाने न्हाऊन निघाला आणि शेकडो महिला व युवती एकाच ठेक्यावर ताल धरत होते. वेगवेगळ्या ठसकेबाज म्युझिकवर थिरकणाऱ्या सहभागी तरुणीं माहिलांचा गरबा पाहण्यासाठी बुलढाणेकरांनी गर्दी केली होती.
या धमाकेदार गरबा महोत्सवाला
‘हॅलो बुलडाणा’चे संचालक जितूभाऊ कायस्थ,कायस्थ कॅटर्सचे संचालक श्री.राजेंद्र कायस्थ, एक्वा लाईन सोल्युशनचे संचालक आशिष खडसे,दैनिक जनसंचलन उपसंपादक अजय राजगुरे, डॉ. शिवानीताई शिंदे,सौ रंजना कायस्थ,स्वराज शिंदे मान्यवर
म्हणून उपस्थित होते. 9 दिवस रंगत जाणाऱ्या गरबा महोत्सवासाठी अमोल पाटील, अमोल चव्हाण, गौरव बरडे,सौरभ कलाकार, नेहा कायस्थ,बरखा बुरकुल,अथर्व परांजपे या प्रशिक्षक समितीने परिश्रम घेतले. दरम्यान शुभम कायस्थ,आकाश पडोळ,आदित्य परांजपे, बुधशाल आराख,अक्षय जैस्वाल,सागर परिहार,युवराज जाधव,कॅमेरामन नितीन सावलकर,फोटोग्राफर नितीन साळवे, फोटोग्राफर विशाल पवार यांनी चोख व्यवस्था केली होती.
▪️विजेत्यांवर दृष्टीक्षेप !
या गरबा महोत्सवात प्रिया मलिक,अवंतिका पाटील,अनद्या पाटील,हर्षिका धोरण,अदिती काळे, समीक्षा गोरे, श्रेयशी देशमुख, ओवी काळे व इतर दोन जण ह्या विजेत्या ठरल्या आहेत.यश कायस्थ,ओम कायस्थ,टिल्लू गोरले या आयोजक समितीने महोत्सवाच्या यशस्वीतीसाठी परिश्रम घेतले.
▪️यांचे लाभले विशेष सहकार्य !
जिजाऊ अर्बन,अदिती अर्बन,चिखली अर्बन,मर्चंट नेव्ही,ठाकूर इंग्लिश क्लासेस, सिध्द हुंडाई,पहेल इन्स्टिट्यूट,साई मल्टीस्पेलिस्ट डेंटल क्लिनिक खंडेलवाल इंटेरिअर, ए आर मोबाईल शॉपी, राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्था, शिवशक्ती अर्बन क्रेडिट सोसायटी,अँक्वा लाईन सोल्युशन यांचे सहकार्य लाभले.