spot_img
spot_img

बाबा सिद्दीकींची हत्या म्हणजे कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर ! -आरोपींना कठोर शिक्षा व्हावी..पोलिसांनी सतर्क रहावे..रविकांत तुपकर यांचे आवाहन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बांद्रा खेरवाडी सिग्नलजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली असून ही दुर्दैवी घटना आहे. तिथे ३ शूटर्सनी त्यांच्यावर ६ गोळ्या झाडल्याने त्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी आहे.या घटनेची कसून चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महत्त्वाच्या नेत्यांची ही व्यवस्था होत असेल तर सामान्य माणसांच्या सुरक्षेचे काय ? हा प्रश्न तुपकर यांनी उपस्थित केलाय.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एकूण ३ शूटर सहभागी होते, ज्यांनी ६ गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या बाबा सिद्दीकी यांच्या छातीत लागल्या, त्यानंतर त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि अशा टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी सतर्क रहावे असे आवाहन देखील तुपकर यांनी केले आहे.दरम्यान कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला असून जेथे नेत्यांची भर दिवसा हत्या होत असेल तेथे सर्वसामान्यांचे काय ?असाही प्रश्न रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!