spot_img
spot_img

‘समृद्धीवर’ झोपेची डुलकी! -अपघातात 3 जण जखमी !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) समृद्धी महामार्गावरील मपो केंद्र मलकापूर अंतर्गत येणाऱ्या दुसरबीड उपकेंद्र समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 306.9 मुंबई कॉरिडॉर येथे 11 ऑक्टोंबर ला कारचा एका वाहनाला मागून धडकल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात 3 जण जखमी झाले आहेत.चालकाला झोपेची डूलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका थांबता थांबत नाही. यंत्रणा अपघात रोखण्यासाठी प्रयत्नरत आहे. परंतु 11 ऑक्टोबरला समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात झाला. समृद्धी महामार्गावरील मपो केंद्र मलकापूर अंतर्गत येणाऱ्या दुसरबीड उपकेंद्र समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 306.9 मुंबई कॉरिडॉर येथे 11 ऑक्टोंबरला कारचा एका वाहनाला मागून धडकल्याने अपघात झाला आहे. झालेल्या अपघातात चालक रमेश बेग,शेख शरीफ,शेख अजीम रा. छत्रपती संभाजी नगर हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले.पोउपनि शैलेश पवार व पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद ताकतोडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश उबाळे तसेच एम एस एफ जवान क्यू आर वी जवान समृध्दी महामार्ग म पो उप केंद्र दुसरबीड, फरदापुर सिंदखेड राजा जि. बुलडाणा यांनी मदतकार्य केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!