spot_img
spot_img

मेहकर लोणार मधिल शेतकऱ्यांचा पिकविमा न मिळाल्याने सरकारच्या विरोधात तिव्र संतापाची लाट-डाॕ.ज्ञानेश्वर टाले राज्य शासनाकडुन हिस्सा न मिळाल्याने शेतकरी पिकविम्यापासुन वंचित_ ऋषांक चव्हाण

मेहकर (हॅलो बुलडाणा) तालुक्यातील बऱ्याच गावागावांमध्ये पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या बैठका आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येत आहे तसेच मा. रविकांत तुपकर साहेबांच्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून अखेर पिक विमा कंपनी व सरकारने पिक विम्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली असून मात्र उर्वरित मेहकर लोणार तालुक्यातील.सन 2023-24 च्या खरीप व रब्बी पिकांचा बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नसल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना तात्काळ रब्बी सोयाबीन व खरिपाचा हरभरा गहू रिजेक्टेड/ अॕक्सेप्टेड सरसकट पिक विमा मिळावा याकरिता वरुड,घाटबोरी,दृर्गबोरी या गावामधिल शेतकऱ्यांकडून पीक विम्याचे फॉर्म भरून घेऊन पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीने तसेच पिकविम्यासाठी शेतकऱ्यांची एकजूट करत मोठी लढाई मेहकर लोणार तालुक्यामध्ये उभी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत या लढाईमध्ये शेतकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.मेहकर लोणार तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. यासाठी गावागावात शेतकऱ्यांचा वनवा पेटत असून राज्य सरकार व पिक विमा कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यां मध्ये तीव्र संतापाची लाट दिसत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!