spot_img
spot_img

सावित्रीची लेक गौरी पवार महाराष्ट्रतून दुसरी ! -राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत घेण्यात आली होती परीक्षा !

देऊळगाव साकरशा (हॅलो बुलढाणा/गणेश पाटील) गौरी पवारने यशाला गवसणी घालत राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावला आहे.त्यामुळे बुलढाण्यासाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येते याचे उत्तम उदाहरण देऊळगाव साकरशा या आतील ते दुर्गम डोंगराळ भागातील असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलीने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये कु गौरी प्रतापराव पवार हिने उज्वल यश संपादन केले असून मुलींमधून महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक मिळविला आहे. गौरीने या परीक्षेमध्ये 138 .75 गुण घेऊन यश संपादन केले आहे. सर्व परिसरामध्ये गौरी प्रतापराव पवार हिचे कौतुक अभिनंदन होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!