देऊळगांव राजा (हॅलो बुलढाणा)तालुक्यातील देऊळगाव मही येथे वरली जुगाराचे आकडे घेताना दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यामुळे येथे वरली जुगार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे शिक्कामोर्तब होत आहे.
वरली चे आकडे घेताना पोलिसांनी
2जणांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून 10 हजार 840 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कारवाई 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी घडली. तालुक्यातील देऊळगाव मही येथे तमन्ना ऑटो इलेक्ट्रिक इलेक्ट्रिशियन च्या बाजूला दोन जण वरलीचे आकडे घेत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली, दरम्यान पोलिसांनी आरोपी शेख इमरान नैनुमुद्दीन रा. रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हल्ली मुक्काम डिग्रस तालुका देऊळगाव राजा तसेच शेख इरफान शेख गुलाब नबी रा. देऊळगाव राजा हे दोघेजण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सार्वजनिक ठिकाणी रोडवर लोकांकडून पैसे घेऊन त्या मोबदल्यात वरलीचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या मोबाईल व्हाट्सअप वर देत असल्याचे आढळले. त्यांच्याकडून दहा हजार किमतीचा मोबाईल तसेच नगदी 840 रुपये असा एकूण दहा हजार आठशे चाळीस रुपयाचा मुद्दमाल जप्त करण्यात आला
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमान्वये पुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ए. एस. आय. कलीम देशमुख करीत आहेत या कारवाईने वरली बहाद्दरांना धडकी भरली आहे.










