बुलढाणा (हॅलो बुलढाणा) तब्बल अडीच लाख मत मिळविणाऱ्या युवा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर त्यांचे बुलढाणा उबाठा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी स्वागत केले आहे. तर जालिंदर बुधवत यांनी मशाल यात्रा यशस्वी केल्याने त्यांचे स्वागत देखील उद्धव ठाकरे यांनी करून त्यांची प्रशंसा केली.
दरम्यान सिंदखेडराजा विधानसभा संघात तुपकर यांनी सर्वाधिक मतं घेतल्याने त्यांनी सिंदखेडराजातून लढावे असा सूर सर्वत्र उमटत आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काल मातोश्रीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे चर्चेदरम्यान रविकांत तूपकर यांची तिकीट फिक्स ? झाल्याची माहिती त्यांच्या समर्थकांकडून खाजगीत देण्यात येत आहे.शेतकरी नेते रविकांत तुपकर महाविकास आघाडी कडून सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रात आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काल भेट घेतल्याने आणि सविस्तर चर्चा केली असल्याने बुलडाणा जिल्हा सात मतदार संघापैकी बुलडाणा सोडून सहा मतदार संघातून त्यांची तिकीट एका मतदार संघात फिक्स असल्याचे समजले जात आहे.परिणामी तुपकर आगामी विधानसभा निवडणुकीत उतरणार असून अनेक इच्छुकांच्या छातीत धडकी भरली आहे.उद्धव ठाकरे पाठोपाठ जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत व प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी तुपकरांचे स्वागत केले आहे.जालिंदर बुधवत यांची देखील उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात बुलडाणा व मोताळा तालुक्यातील १५१ गावांमध्ये मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिनांक २३ सप्टेंबर रोजी बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमाचा कार्य अहवाल मातोश्री मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी त्यांनी मशाल यात्रा व आक्रोश मोर्चाचे कौतुक केले. तसेच तसेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी एकजुटीने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.यावेळी संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, सह संपर्क प्रमुख छगन दादा मेहेत्रे, उप जिल्हा प्रमुख सुनील घाटे, दिलीप वाघ, डी एस लहाने, तालुका प्रमुख लखन गाडेकर, शहर प्रमुख रमेश धुनके, हेमंत खेडेकर, बजा समितीचे संचालक राजु मुळे यांची उपस्थिती होती.