spot_img
spot_img

‘मरेगा’च्या अनुदानीत विहीरीच्या लाभात लाभार्थी कोरडेच ! -कोरडवाहू शेतीत शेतकऱ्यांच्या घामाचेच सिंचन !

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) एम.आर.ई.जी.स(मरेगा)अंतर्गत शेतकऱ्यांना 100% अनुदानित सिंचन विहिरीचा लाभ द्यावा अशी मागणी गटविकास अधिकाऱ्यांना जय शिवसंग्राम संघटनेने निवेदनातून केली आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना शासना मार्फत एम.आर.ई.जी.एस. (मरेगा) अंतर्गत शेतकऱ्यांना 100% अनुदानित सिंचन विहिरीचा लाभ द्यावा, देऊळगावराजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना कोरडवाहू जमीन असल्यामुळे या शेतकऱ्यांना शासन निर्णय नुसार 100% अनुदानित विहिरीचा लाभ द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.तालुक्यातील अनेक गरजू शेतकरी सिंचन विहिरीपासून वंचित आहे. कोणत्याही शेतकऱ्यांना दुजाभाव न करता शासन शंभर टक्के अनुदानित विहिरीचा लाभ देण्यात यावा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना कोरडवाहू जमीन असल्यामुळे या अनुदानाची 100% आवश्यकता आहे तरी येणाऱ्या सात दिवसात आपल्या 100% टक्के अनुदानित विहिरीच्या यादीत तालुक्यातील शेतकऱ्यांना समाविष्ट करण्यात यावे.अन्यथा जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी निवेदन देताना तालुका अध्यक्ष जहीर खान पठाण, शहराध्यक्ष अजमत खान, युवक शहराध्यक्ष शंकर वाघमारे, अनिश शहा, आदिल शेख, राजू शेख, संतोष हिवाळे, सुरेश निकाळजे , अदनान खान, साबीर खान, असलम पठाण उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!