मेहकर (हॅलो बुलढाणा) उबाठा शिवसेनाची उमेदवारी मागणाऱ्या एका नवख्या उमेदवारा विरोधात मेहकर मतदार संघातील अन्य इच्छुक उमेदवारांनी १ आक्टोंबर दरम्यान थेट मातोश्री गाठून मा.उद्धव ठाकरे यांना ‘नया है वह.. नही चलेगा!’ असे सांगत विरोध दर्शविला आणि ठाकरेंनी देखील या उमेदवारांना त्यांना तिकीट न देण्याचा शब्द दिल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी भाऊगर्दी झालेली दिसते.बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवार धडपडताहेत. तिकीट मिळविण्यासाठी मोठमोठे मोर्चे कार्यक्रम आयोजित होत आहेत.बुलढाणा आणि सिंदखेड राजात उबाठा शिवसेनेने मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चा काढला होता.या दोन्ही मोर्चांना प्रतिसाद मिळाला परंतु असाच मोर्चा काढण्याचा प्रयत्न विधानसभा लढवू इच्छिणाऱ्या एका उमेदवाराने केला मात्र या मोर्चात खऱ्या निष्ठावंतांना डावल्यामुळे सदर मोर्चा अयशस्वी ठरल्याचे दिसून आले.प्रामुख्याने गेल्या पंधरा वर्षापासून कार्य करणारे व कार्यकर्त्यांचा मोहोळ असणारे युवा सेनाचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे यांच्यासह अनेक चेहरे मोर्चात दिसून आले नाही.जे या मोर्चात उपस्थित झाले होते त्यांच्या चेहऱ्यावचे हावभाव वेगळीच कहानी दर्शवीत होते.इतरांचा विरोध असणाऱ्या सदर उमेदवाराच्या मोर्चात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील पाठ फिरवली !दरम्यान १ आक्टोंबर ला मेहकर विधानसभा मतदारसंघातील सर्वच इच्छुक उमेदवार मातोश्रीवर गेले होते.या उमेदवारांनी त्या उमेदवाराला उमेदवारी देऊ नये म्हणून मा.उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी रेटून धरली. शिवाय त्यांनी सदर उमेदवाराच्या कार्यशून्यतेचा व निष्ठावंतांच्या सेवाकार्याचा पाळा वाचून दाखवला. यावेळी ठाकरेंनी त्या उमेदवाराला उमेदवारी न देण्याचा शब्द दिला असल्याची खात्रीलायक माहिती ‘हॅलो बुलढाणा’ला प्राप्त झाली आहे. त्यामुळे पुढे काय होते ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल !