बुलडाणा (हॅलो बुलढाणा) माजलगाव जि.बिड येथे एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. या घटनेचा बुलडाणा शहरातील सर्व शाखीय सोनार समाज बांधवांनी निषेध करून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
माजलगाव येथील एका शिक्षकाने सोनार समाजातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्यामुळे त्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. बुलडाणा शहरातील सर्व शाखीय समाज बांधवांनी एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला व संत नरहरी सोनार बहुऊद्देशीय संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये आरोपीला जलद गतीने न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा सुनावली जावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतची निवेदन जिल्हाधिकारी बुलडाणा यांना देण्यात आले. सदर निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष श्रीराम भाऊ उज्जैनकर, रविभाऊ घुसळकर (AISF),शामराव मोरे,विश्वनाथ ठोसर,आशिष उज्जैनकर, सुनील पिंगळे, प्रदीप अर्धापुरकर, निलेश रत्नपारखी, राजुसेठ महांळणकर, विजय सोनर. अमोल कर्हे, सुनील तळेकर, सौ.वैशाली ताई तळेकर आणि सौ.गोदावरी ताई शिंदे यांची उपस्थिती होती.