बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सर्वत्र माँ आदिशक्तीचा जागर सुरू असून येथील राजे लॉनमध्ये यंदा प्रथमच ‘हॅलो बुलढाणा’ व कायस्थ कॅटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या गरबा महोत्सवाला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी होत आहे. नियोजनपूर्वक आयोजन केल्याने या गरबा महोत्सवाला बुलढाणेकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय!
‘हॅलो बुलढाणा’ न्यूज वेब बुलढाणेकरांचा कायस्थ कॅटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विष्णूवाडीतील राजे गार्डन येथे 20 सप्टेंबर ते एक आक्टोंबर दरम्यान मोफत विशेष गरबा प्रशिक्षण घेण्यात आले होते.आता हा गरबा उत्सव 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान रंगत जाणार आहे. काल
प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे, ठाकूर इंग्लिश स्पिकिंग क्लासेसचे संचालक संतोष ठाकूर, मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, दैनिक हितवादाचे प्रतिनिधी राजेश डीडोळकर यांची उपस्थिती होती.दरम्यान गरबा खेळणाऱ्या महिला व युवतींसाठी लाखोंचे बक्षीस जिंकण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे.गरबा उत्सावाने भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचवला आहे. एकापेक्षा एक वेशभूषा व नृत्याने उपस्थित मंत्रमुग्ध होताना दिसतात. दरम्यान उत्कृष्ट गरबा सादरीकरण करणाऱ्या व उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या महिला व युवतींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन सन्मानित केले जात आहे.त्यामुळे दररोज गरबा महोत्सवाला रंग चढत आहे.