spot_img
spot_img

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने ऑटोला उडवले ! -4 जण गंभीर !

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) येथील बुलढाणा मार्गावरील मुंधडा पेट्रोलपंपा समोर अज्ञात ट्रॅक्टरने ऑटोला उडवल्याने ऑटो मधील ४ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना 6 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजता घडली आहे.त्यापैकी 3 प्रवाशांना रुग्णालयात उपचारार्थ रेफर करण्यात आले आहे.

मलकापूर मार्गावरून वाळू वाहतूक सुसाट सुरू आहे. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान मलकापूर ते उमाळी जात असलेला एम एच 28 टी 2804 क्रमांकाच्या ऑटोला अज्ञात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने धडक देऊन पसार झाल्याची घटना घडली.यावेळी स्थानिक नागरिकांनी जखमी प्रवाश्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार साठी दाखल केले. ऑटो चालक राजेंद्र गिरी वय ४५ उमाळी हा गंभीर जखमी झाला आहे. महिला नौशाद बी शेख युनूस वय ४५ रा. उमाळी व शेख युनूस शेख इस्माईल रा. उमाळी वय ५५ याचे प्राथमिक उपचार करण्यात आले तिन्ही प्रवासी रुग्णांच्या
पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना डॉ.नीरज क्षिरसागर यांनी बुलढाणा रेफर करण्याचे सांगितले. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वर्गे पुढील तपास करीत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!