देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव )लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अदिशक्ती माळाची देवीचे संस्थान हजारो भाविकांचे गर्दीने फुलून गेले आहे.
देऊळगांवमही गावाच्या पूर्वेस अगदी दीड ते दोन किलोमीटर अंतरावर नयनरम्य
परिसर,घनदाट गर्द झाडी, पक्षांचा मंजुळ आवाज माळ रानावर हिरव्यागार शालुने
नटलेली वनराई, अशा निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या अदिशक्ती आई अंबा भवानीचे मंदीर आहे. नवरात्रासह इतर दिवशी सुद्धा परिसरातील असंख्य भाविक या ठिकाणी दर्शन व नवस फेडण्यासाठी मोठ्याप्रमाणात येतात.येथील अतिशय सुंदर आल्हादायक वातावरण पाहून अनेकांचे मनभरावुन जाते.
नवरात्रउत्सवा सोबतच इतरही वेळी भाविकांची येथे गर्दी दिसून येते. गावापासून रमत-गमत गप्पागोष्टीत भाविक मंदिरावर पोहचते. माळरानावर प्रकटलेली व नवसाला पावणारी अशी आख्यायिका असणाऱ्या अदिशक्ती आई अंबा भवानीचे (माळाच्या ) आईचे चारही बाजूने असलेल्या गावांच्या मध्यभागी मंदीर आहे. पूर्वी आई अंबा भवानी गावा शेजारील नंदीच्या टेकडीवर होती. परंतु परिसरात जवळच कत्तलखाना असल्यामुळे देवी एकाच रात्रीतुन अदृश्य होऊन माळरानावर
(गवळनीचा माथा)येथे प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. भाविकांनी मोठ्या
भक्ती भावाने श्रद्धने आई अंबा भवानीच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली. काही वर्षापुर्वी या परिसरात ग्रामस्थांनी लोक वर्गणीतुन मंदीर बांधले.त्यानंतर आई अंबा भवानीच्या कृपा आशिर्वादाने या तीर्थस्थळाला ‘ब’ वर्ग
दर्जा मिळाला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची हेळसांड होऊ नये, यासाठी
भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. घटस्थापनेपासून नऊही दिवस हा
परिसर भाविकांच्या गर्दीने गजबज अगदी फुलुन जातो. नवरात्रोत्सव काळात
नित्य नियमाप्रमाणे दररोज सकाळी सहा वाजता आई अंबा (माळाच्या) देवीची सामूहिक आरती करण्यात येते. आरतीसाठी परिसरातील भाविक हजारोच्या संख्यने उपस्थित
राहतात. नवसाला पावणारी आणि मनोकामना पूर्ण करणारी अशी आख्यायिका असणाऱ्या
आई अंबा भवानीला भाविक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, यासाठी
देवीकडे साकडे घालतात. माई आई अंबा भवानी देखील भक्तांच्या मदतीला
धावुन येते. मनात शुद्ध हेतु बाळगुण जे भक्त देवीला शरण जातात, त्यांना
निश्चचित फळप्राप्ती होते. याचा अनुभव अनेकांना आल्याचे भाविक सांगतात.
विजयादशमीला महाप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता होते.
आरतीचा लाभ घेण्यासाठी महिलांची लक्षनीय गर्दी
देऊळगांव मही, डीग्रस खैरव, सरंबा, नारायण खेड या गावातून महिलांची मोठ्याप्रमाणात गर्दी राहते. दररोज सकाळी 6:00 वाजता होणाऱ्या आरतीचे भाग्य लाभले पाहिजे यासाठी महिलांची सकाळीच 5 : 00 वाजेपासून रस्त्यावर गर्दी दिसून येते.