बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आगामी विधानसभा निवडणुकीत तोंडावर येवून ठेपली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. तशी आग्रही मागणी देखील रेटली जात असल्याची माहिती आज भाजपाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. भाजपा जनसंपर्क अभियाना संदर्भातील माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ गणेशजी मांटे तसेच माजी आमदार विजयराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांच्याकडे भाजपा जनसंपर्क अभियानाची जबाबदारी दिली आहे.या अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या योजना केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचा उद्देश असून जास्तीत जास्त जागा भाजपाला मिळाव्या यायासाठी जिल्हा भाजप प्रयत्न करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात विजयराव शिंदे , योगेंद्र गोडे यांचे नेतृत्वात चिखली येथे आमदार श्वेता ताई महाले तसेच सिंदखेड राज्यात डॉ गणेश मांटे,तुकाराम कायंदे,विनोद वाघ,मेहकर येथे प्रकाश गवई सारंग माळेकर यांचे नेतृत्वात जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार असल्याचे डॉ. मांटे म्हणाले. दरम्यान माजी आमदार विजयराज शिंदे यांना बंडखोरी बाबत प्रश्न छेडला असता, ‘आधी जागा निश्चित होऊ द्या त्यानंतर कळेल’ असे सूचक उत्तर दिले.