साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/दर्शन गवई) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच सिंदखेडराजा विधानसभेच्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या साखरखेर्डा गावामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने भव्य जनसंवाद मेळाव्याचे आयोजन दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्री पलसिद्ध मठ संस्थानांमध्ये आयोजित करण्यात आला आहे,
सदर जनसंवाद मेळाव्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुजात प्रकाश आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत,त्यामुळे कार्यक्रमाला मोठे संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे युवा महासचिव विशाल गवई यांनी केले आहे,
वंचित बहुजन आघाडीने सौ सविताताई मुंडे यांना उमेदवारी दिली असून एक प्रकारे प्रचाराचा नारळ सुजात आंबेडकर यांच्या संवाद मेळाव्यातून होणार असल्याचे संकेत मिळत आहे या अगोदर सुद्धा प्रकाश आंबेडकर साखरखेर्डा येथे सभेकरिता आले होते आठवडी बाजारामध्ये त्यांची सायंकाळी सभा पार पडली होती, व आता त्यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हे जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून सभेला उपस्थित राहणार आहेत, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी साखरखेर्डा यांच्यावतीने कार्यक्रमाची भव्य तयारी करण्यात आली असून गावोगावी प्रचार रथ सुद्धा फिरत आहे,