spot_img
spot_img

पत्रकारांच्या बातमीवर व्हाट्सअपवर सार्वजनिक रित्या लाचखोरीचा आरोप करणे आंगलेट येणार ! -पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल !

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/निलेश डिघोळे)ब्रेकिंग महाराष्ट्र हे महाराष्ट्रातील मराठी भाषेतील अधिकृत न्यूज पोर्टल असून, ते केंद्र सरकारकडे नोंदणीकृत आहे. मुंबई, नगर, व पुणे येथून राज्यभर प्रसारित होणाऱ्या दैनिकात पत्रकार अनिल दराडे हे सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत.सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आ. शिंगणेंनी सर्वच इच्छुकांची धाकधूक वाढवली!’ या दिनांक २९ सप्टेंबर २०२४च्या बातमीवर डॉ. सुनील कायदे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ – २०२४’ या व्हाटसअप ग्रुपवर ८०८०८ ६३५८५ या क्रमांवरून पत्रकारितेच्या हेतूवर संशय घेणारी कॉमेन्ट करण्यात आली. एवढेच नाही तर संबंधित पत्रकाराने पाकिट घेऊन बातमी लिहिली असेल या अनुषंगाने पाकीट भेटलं असेल दुसरं काय, अशी पोस्ट केली, यामुळे मी किनगाव राजा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करून वरील मोबाईल नंबर धारकांनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार यांनी केली.

अनिल दराडे हे पूर्णवेळ पत्रकार असून, गेली ३० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे.भारतीय राज्यघटनेच्या कलम १९(१) (अ) अनुसार मला प्राप्त पत्रकारितेच्या अधिकारान्वये मी प्रकाशित केलेल्या सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आ. शिंगणेंनी सर्वच इच्छुकांची धाकधूक वाढवली!’ या दिनांक २९ सप्टेंबर २०२४च्या बातमीवर डॉ. सुनील कायदे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ – २०२४’ या व्हाटसअप ग्रुपवर ८०८०८ ६३५८५ या क्रमांवरून पत्रकारितेच्या हेतूवर संशय घेणारी कॉमेन्ट करण्यात आली. एवढेच नाही तर संबंधित पत्रकाराने पाकिट घेऊन बातमी लिहिली असेल या अनुषंगाने पाकीट भेटलं असेल दुसरं काय, अशी पोस्ट केली, व माझ्यावर सार्वजनिकरित्या लाचखोरीचा आरोप करून माझे चारित्र्यहनन केले, तसेच माझ्या कर्तव्यात अडथळा निर्माण होईल, अशा प्रकारे माझ्या निष्कलंक पत्रकारितेच्या हेतूवर संशय उपस्थित करून जनमाणसात माझी प्रतिमा मलिन केली.
यास्तव, या क्रमांकाचा जो कुणी आरोपी आहे, त्याच्याविरोधात माझी रितसर तक्रार असून, आपण त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती केली आहे. हा मुद्दा केवळ एखाद्या गुपवरील निरर्थक पोस्टचा किंवा उल्लेखाचाच नाही, तर पत्रकारांच्या व्यक्तिस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. यास्तव, आपण तातडीने कठोर कारवाई करावी, अशी विनंती केली असून सदर तक्रारी ची प्रतिलिपी मा. देवेंद्रजी फडणवीस, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई,मा. जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलढाणा,
मा. जिल्हा माहिती अधिकारी, बुलढाणा यांना देण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!