बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काळ्या मातीसाठी झटणाऱ्या जिल्ह्यातील कृषी सहाय्यकासह 8 कर्तबगार शेतकऱ्यांना आज सायंकाळी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ही बाब निश्चितच गौरवास्पद असून बुलढाण्याचा डंका राज्यात वाजत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी,व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज 29 सप्टेंबर रोजी सायं. 5 वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित करण्यात आला आहे.
कोविड तसेच विविध कारणांमुळे प्रलंबित असलेले राज्यातील सन 2020,2021 व 2022 या तीन वर्षांतील पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री दादा भुसे, मुंबईचे पालकमंत्री व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित होणार आहे.यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विविध कृषी पुरस्कारांसाठी 8 शेतकऱ्यांची निवड झाली आहे.
▪️असे आहेत विजेते शेतकरी..
1) विठ्ठल रामेश्वर धांडे (पद्मश्री डॉ. विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार 2020), कृषी सहाय्यक मेहकर 2)शशिकांत पुंडकर,(वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार 2020), येऊलखेड ता. शेगाव 3)कैलास नागरे (युवा शेतकरी पुरस्कार 2020),शिवनी आरमाळ तालुका देऊळगाव राजा 4)गणेश लंबे (वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार
2020),माळखेड
तालुका मेहकर 5)पांडुरंग देविदास शिंदे (कवी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार 2021),मंगरूळ तालुका चिखली 6)प्रकाश रणीत (युवा शेतकरी पुरस्कार 2021),
कोकलवाडी तालुका नांदुरा 7)शिवाजी भाकरे (वसंतराव नाईक शेती निष्ठ पुरस्कार 2021),कंडारी तालुका नांदुरा 8)देविदास जाधव (वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट 2022),भूसर तालुका मोताळा