spot_img
spot_img

💥ब्रेकिंग ! सायबर भामट्याचा शिक्षकाला ऑनलाईन ‘धडा!’ -तब्बल 1 लाख 70 हजार रुपयांनी केली फसवणूक ! -आरोपी ताब्यात ; 1 ऑक्टोंबर पर्यंत PCR !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दिवसागणीक सायबर गुन्हेगारीत वाढ होतेय. सायबर भामट्यांनी शेअर मार्केटिंगमध्ये नफ्याचे आमिष दाखवून सुशिक्षित लोकांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. बुलढाणा शहर सायबर पोलीस ठाण्यातही आज एक लाख 70 हजार रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा उजेडात असून आरोपी सुनील सुरेश वैंगणकर रा.वसई जिल्हा पालघर याला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस सूत्रानुसार,16 मार्च 2024 रोजी मलकापुर येथील शिक्षक शैलेंद्र लक्ष्मण गुळवे
यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती की ऑनलाईन शेयर मार्केट ट्रेडींगचे नावाने सायबर चोरट्यांनी ऑनलाईन 1,70,000 रुपयांची आर्थिक फसवणुक केली
आहे. दरम्यान सायबर पोलीस स्टेशनला अप क्र. 14/2024 कलम 415, 419, 420 IPC R / w 66 c d IT Act नुसार गुन्हा दाखल
करण्यात आला.
पोलिसांनी तपास चक्र फिरवले असता, 26 सप्टेंबर रोजी सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर यांनी पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधिक्षक बी.बी. महामुनी यांचे मार्गदर्शनात सायबर पो.स्टे.चे पोहेकॉ शकील खान, पोलीस नाईक राजदीप वानखडे, विक्की खरात, क्षितीज तायडे असे तपास पथक तपास कमी पाठविले. सदर गुन्ह्यांमध्ये विविध लोकांकडून अकाउंट विकत घेवुन ते मुख्य फ्रॉडस्टर ला पुरवणारा आरोपी सुनिल सुरेश वैंगणकर वय 45 वर्षे यांस वसई जि. पालघर येथुन त्याचे राहते घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीचे ताब्यातुन तिन अॅन्ड्रॉईड मोबाईल, विवीध बँकाचे पाच ATM कार्ड तसेच मोबाईलमध्ये जवळ-पास 200 आधार कार्ड,पॅनकार्डचे फोटो मिळुन आले आहे. सदर आरोपी नवीन बँक खाती उघडुन ते मुख्य फ्रॉडस्टर ला पुरवणार होता.
सदर आरोपीस वि. न्यायालय मलकापुर यांनी 01 ऑक्टोंबर पर्यंत PCR
दिल्याने आरोपीस विचारपुस करुन सायबर पोलीस इतर आरोपींचा शोधण्याचा प्रयत्न
करत आहेत.

▪️सोशल मीडिया वापरतांना काळजी घ्या ! 

सध्या सोशल मीडियावरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यात नव्याने बोगस शेअर्स ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक होत आहे. तसेच प्रत्येकाने आपल्या प्रोफाइलची काळजी घेणं गरजेचं आहे. खास करून मुलींना आपले प्रोफाइल लॉक ठेवले पाहिजे. अनेक घटनांमध्ये हॅकर्स मुलीचे अश्लील फोटो वापरून ब्लॅक मेल करणं, तसेच सध्या पार्ट टाइम जॉबच्या नावाने अनेक लाखोंचा गंडा घातला जात आहे. त्यामुळं पूर्ण खात्री केल्याशिवाय आपण पैसे पाठवू नये किंवा अज्ञात व्यक्तिला आपल्या बँकेचा तपशील देऊ नये. तसेच मोबाईलवर येणारी कोणतीही लिंक क्लिक करू नये, अनेक केसेसमध्ये रिमोर्ट एक्सेस अँपचा वापर करून हॅकर्स बँक खाते रिकामे करतात. अशी कुठली ही लिंक आल्यास किंवा कोणी अज्ञात व्यक्तीने ओटीपी मागितला तर सायबर सेलशी संपर्क साधण्याचं आवाहन, सायबर पोलीसांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!