चिखली (हॅलो बुलढाणा/व्ही झालटे) शहरालगतचा सहारा व धनवान पार्क अनेक समस्यांचे विळख्यात सापडला असून या समस्येंकडे कुणी माय बाप लक्ष केंद्रित करणार काय ? असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
शहरालगत असलेल्या सहारा पार्क व धनवान पार्कला अनेक समस्यांनी ग्रासले असून याकडे नगर पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष्य करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.येथे मोठ्या प्रमाणत लोकवस्ती आहे. लाखो रुपयांचा कर घेऊन देखील नागरिकांना हव्या त्या अर्थात मूलभूत सुविधा मिळत नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे घंटागाडी येत नाही. त्यामुळें परिसरातील नागरिक उगड्यावर कचरा टाकत असल्याने रोगराई पसरली. नागरिकांना डेंग्यू ताप यासह अनेक आजार होत आहेत.या दोन्ही परिसरात नगर पालिकाने नळ कनेक्शन सुद्धा दिले नाही.परिणामी नागरिकांना फिल्टरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. शिवाय गल्लीत लाईट नाही त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. परिसरात रात्री अंधार असल्याने विंचू काट्याची भीती मोठ्या प्रमाणात आहे.महाबीज पर्यंत नगर पालिकेची लाईट व्यवस्था असून या परिसरात लाईट नाही.याबाबत नागरिकांनी अनेक वेळा निवेदन दिले मात्र याकडे नगर पालिका प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे पहावयास मिळत आहे.
▪️मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट अनेक दिवसापासून बंद !
स्थानिक महाबीज ते रिलायन्स पेट्रोल पंप दरम्यान स्ट्रीट लाईट गेल्या अनेक महीण्यापसून बंद आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांना रात्रीच्या वेळी वाहने चालवताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.