देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड च्या नाल्यामध्ये दीपक निकाळजे यांच्यासह त्यांचा पाच वर्षीय चिमुकला खेड येथील ओढ्यात वाहून गेला.त्यांचे प्रेत अजून मिळाले नसताना, पुन्हा एक दुःखद बातमी समोर आली आहे.मौजे खामगाव येथील प्रदीप श्रीरंग जाधव हा 30 वर्षीय व्यक्ती गावाकडे परतत असताना खामगाव गावाजवळील पूला समोरील ओढ्याला आलेल्या पुरात जाधव वाहून गेल्याची घटना 27 सप्टेंबरला घडली आहे.
या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी व नैसर्गिक आपत्ती विभागाला खामगाव येथील तलाठी यांनी 27 सप्टेंबरला पाठविला आहे. मौजे खामगाव येथील प्रदीप श्रीरंग जाधव हा 30 वर्षीय व्यक्ती गावाकडे परतत होता. तो घरी ना पोहोचल्यामुळे आज सकाळी 28 सप्टेंबरला गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांची मोटारसायकल व बॅग ही खामगाव गावाजवळील पूला समोरील ओढ्या शेजारी आढळून आली त्यामुळे सदर व्यक्ती कदाचित काल आलेल्या पुरात वाहून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. खामगाव पुलापासून पुढे जाणाऱ्या नाल्याची रुंदी अंदाजे पाच सहा फुटाची आहे व नाल्यामध्ये चार ते पाच फुटापर्यंत पाणी आहे. नाल्याच्या आजूबाजूस छोटे झाडे झुडपे वेली व लोमकळ्या असल्याने शोध बचाव पथकाची बोट चालणे शक्य नसल्याचे तलाठी यांनी अहवालात नमूद केले आहे.सदर नाल्याचे अंतर 2 किलोमीटर असल्याने पुढे वाघोरा या पुलापासून पात्र रुंद होत जाते आणि सावरखेड तेजन पासून ते किनगाव राजा पर्यंत पात्र रुंद असल्यामुळे बोट चालू शकते रात्री अंधारामुळे सध्या शोध बचाव पथक थांबलेले होते. 27 सप्टेंबरला सकाळी 8 वाजता पासून शोध कार्य खामगाव ग्रामस्थांच्या वतीने व बुलढाणा येथील एनडीआरएफ च्या टीमने खामगावच्या पुलापासून ते सावरखेड तेजा आडगाव राजा जाणाऱ्या पुलापर्यंत केले त्यानंतर किनगाव राजाच्या पुलापर्यंत 20 किमी पर्यंतच शोध कार्य करण्यात आले परंतु सदर व्यक्ती आढळून आला नाही.त्यानंतर रात्रीच्या अंधारामुळे पुन्हा शोध कार्य थांबविण्यात आले होते.दरम्यान 28 सप्टेंबर रोजी पुन्हा ग्रामस्थांच्या वतीने शोध कार्य करण्यात येईल ग्रामस्थांनी शोध कार्याला सहकार्य करावे असेही या अहवालात म्हटले आहे.










