डोणगाव (हॅलो बुलढाणा / हमीद मुल्लाजी) परिसरात मोठ्याप्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. पोलिसांनी अवैध धंदे बंद करण्याची मागणी पांगरखेड येथील ग्रामस्थांनी केली आहे. या विषयी पांगरखेड ग्रामपंचायतने ठरावही घेतला आहे. पांगरखेड येथे गत काही दिवसांपासून वरली, मटका, अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गावातील अवैध धंदे बंद व्हावे यासाठी ग्रामपंचायतने ठराव संमत करून २६ सप्टेंबर रोजी डोणगाव पोलिसांना निवेदन दिले आहे. यावेळी पांगरखेडचे सरपंच सुधाकर धंदरे, ग्रामसेवक सागर काळे, गोपाल पाखरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या सोबतच बेलगाव. ईश्वी. घाटबोरी. लोणीगवळी या ठिकाणी सुध्दा मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे ज्या मुळे शेकडो कुटुंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत आत मजुरांचे सोयाबीनचे सिजन सुरू असल्याने मजुर वर्गा कडे पैसे आहेत त्याचाच फायदा घेऊन अवैध धंदे वाले गावा गावात आपले अवैध धंदे पोलीस विभागाला हाताशी धरून सुरू करीत आहोत. या धंद्यात मात्र पोलीस विभागाच्या काही कर्तव्य निष्ट कर्मचारी व अवैद्य धंद्यावाल्याचे फायदे होतात मात्र गरीब जनतेचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तरी वरिष्ठानी या कडे लक्ष द्यावे ही असी सुज्ञ नागरिका कडुन मागणी केली जात आहे.
- Hellobuldana
‘एसपी साहेब इकडे लक्ष द्या हो!’ -जिल्ह्यातील आदर्श गांव पुरस्कार प्राप्त ‘ग्रामपंचायतचा ठराव,अवैध धंदे बंद करा !’

By admin