बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आरटीओ कर्मचारी संघटनेने कर्मचा-यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यासांठी दि.२४ सप्टेंबर पासून सुरू केलेला बेमुदत संप आश्वासना अंती मागे घेण्यात आला आहे.
विविध मागण्यांसाठी २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप सुरू करण्यात आला होता. दरम्यान मा.परिवहन आयुक्त कार्यालयात सर्व मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. सदर चर्चेत संघटनेच्या मागणीनुसार दि.३० नोव्हेंबर पर्यंत वरिष्ठ लिपिक ते कार्यालय अधिक्षक पदांचे सेवाप्रवेश नियम अंतिम करण्यात येतील. तो पर्यंत पात्र कर्मचा-यांना तदर्थ पदोन्नती देण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले.
महसुल विभागानूसार बदल्या करण्याचे धोरण रद्द करण्यात आले असून पूर्वीप्रमाणेच बदलीकरिता पूर्वीप्रमाणेच १५ विभागातंर्गतच बदल्या करण्याचेही मान्य केले. प्रशासनाने इतर मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्याचेही मान्य केले.दि.२४ सप्टेंबर २०२४ बेमुदत संप स्थगित करण्यात आला आहे.