बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बिबट्या अटॅक मोडवर असून यापूर्वी गिरडा व इतर गावात भयानक घटना घडल्या आहेत. आता मोताळा तालुक्यातील नळकुंड येथे एका बिबट्याच्या
हल्ल्यात शेतकरी सुभाष बावस्कर जखमी झाल्याची घटना काल घडली.जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मोताळा वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील नळकुंड येथे गट क्रमांक १६ मध्ये 55 वर्षीय शेतकरी सुभाष किसन बावस्कर हे शेतातील घरात झोपलेले असताना त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्लाबोल केला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.त्यामुळे शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे.