बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कृषी विभागाच्या गलथान कारभाराला वैतागल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज आक्रमक भूमिका घेतली होती. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईस्तोवर त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी तथा अधीक्षकांच्या दालनात गादी आणि उशी घेऊन मुक्काम आंदोलन छेडले असता त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.रविकांत तुपकरांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. तुपकर समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित झालेत.
अनेक शेतकरी पिक विमा पासून वंचित असून कृषी विभागाकडून तारीख पे तारीख दिल्या जात आहे.विशेष म्हणजे तुपकर यांनी असा आरोप केला की कृषी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी नसताना बोगस पंचनामा करण्यात आला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रविकांत तूपकर यांनी आज जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या दालनात
गादी आणि उशी घेऊन मुक्काम आंदोलन सुरु केले होते.जोपर्यंत 100% शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली होती.शिवाय नऊ महिने हे पैसे देण्यासाठी उशीर का झाला ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता 12% व्याजाने पैसे घेण्याची जबाबदारी कृषी विभागाची असल्याचे सांगत त्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा पवित्र घेतला होतापरंतु त्यांना पोलिसांनी आता अटक केली असून मोठा तणाव निर्माण झाला आहे .