spot_img
spot_img

सोनसाखळीचोराला ‘एलसीबी’ने ठोकल्या बेड्या!

मलकापूर (हॅलो बुलढाणा / करण झनके) शहरातून सोन्याची चेन चोरून नेणारा सराईत बुलडाणा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने पकडला आहे.त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.प्रीतम अविनाश बऱ्हाटे (वय २१) असे आरोपीचे नाव असून, तो जळगाव खांदेश येथील रहिवासी आहे. त्याने २९ जानेवारी रोजी मलकापूर शहरातून सोन्याची चेन हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 392, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास एलसीबीकडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी, अशोक थोरात यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे मार्गदर्शनात पथकाने तपास सुरू केला.

चेन स्नॅचिंगमधील आरोपीचे सीसीटीव्ही फूटेज व तांत्रिक विश्लेषनाचे आधारे आरोपी निष्पन्न झाला. आज, २५ सप्टेंबर रोजी आरोपी प्रीतम याला अटक करण्यात आली.त्याच्याकडून ६.१५० ग्राम सोन्याची गोल गोळी (किंमत ३४ हजार रुपये) जप्त करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश शक्करगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन माळी, पोलीस हवालदार चांद शेख अनुप मेहर, नायक पोलीस गणेश पाटील, चालक हवालदार शिवानंद मुंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!