चिखली (हॅलो बुलढाणा / संतोष बाहेकर) जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गवंडी,प्लंबर, मेकॅनिक,फिटर व इलेक्ट्रिशियन ,पंप ऑपरेटर असे तीन नल जल मित्र म्हणून यांची निवड करण्यात येणार आहे. तरी इच्छुकांनी 26 सप्टेंबर पर्यंत आपल्या ग्रामपंचायत मध्ये संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी केले आहे. पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती, साठी तीन नल जलमित्र गावातील अनुभव असलेल्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. सदर उमेदवारास गावातच रोजगार उपलब्ध होणारा असल्यामुळे ग्रामपंचायत ला 26 सप्टेंबर पर्यंत संपर्क साधावा. गावातील सर्व नागरिकांना प्रति मानसी प्रतिदिन 55 लिटर विहित गुणवत्तेसह व दैनंदिन स्वरूपात नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक अडचणीमुळे मनुष्यबळाची उपलब्ध असणे आवश्यक आहे. म्हणून पाणीपुरवठा योजनेच्या नियोजन दुरुस्ती साठी टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.
तरी सुशिक्षित बेरोजगारांनी नल जलमित्र म्हणून ग्रामपंचायत मध्ये आपली शैक्षणिक पात्रता तसेच शैक्षणिक कागदपत्रे ग्राम ग्रामपंचायतला द्यावे असे आवाहन गुलाबराव खरात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.