देऊळगांव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) तुमच्या शिवाय मी शुन्य आहे आजवरच्या राजकीय प्रवासात तुम्ही मला नेहमीच नवीन उभारी दिली आहे. म्हणूनच शेवटच्या घटकातला माणूस जपून ठेवण्याचं सामर्थ्य मला राजमाता जिजाऊंच्या आशिर्वादामुळे लाभलं त्यामुळे समन्वयाची घडी कायम ठेवताना अनेक माणसं जोडता आली तिच माणसं माझी मालमत्ता आहे,तुमचा विश्वास जराही ढळू देणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार जलपुरुष तोताराम कायंदे यांनी व्यक्त केले.
मातृतिर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार तोतारामजी कायंदे यांचा 78 वा वाढदिवस दुसरबीडच्या गितांजली मंगल कार्यालयात दिमाखात साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, या जगातील इतर अनेक लोकांप्रमाणेच, मी देखील वर्षभर माझ्या या वाढ दिवसाची वाट पाहतो; माझा वाढदिवस. हा दिवस माझ्या आयुष्यात फक्त तुम्हा सर्वांमुळेच उत्साहात साजरा होत आला आहे. तुमचे अंतःकरण वितळणारे आशीर्वाद आणि शुभेच्छांनी माझे संपूर्ण आयुष्य अशा अनोख्या पद्धतीने फुलून जावो जे शब्दात व्यक्त करता येणार नाही.
वाढदिवस हा एक दिवसच नाही तर माझ्या आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस जो तुम्हाला समर्पित आहे, आणि तुमच्यापैकी प्रत्येकाने माझ्या वाढदिवशी अत्यंत पोटतिडकीने उपस्थित राहून आणि हा भव्य कार्यक्रम घडवून आपण माझ्या तुमच्यावर असलेल्या प्रेमाची पोचपावतीच दिली आहे. तुम्हा लोकांसोबत राहून मी धन्य झालो. तुम्ही सर्वजण बऱ्याच वर्षांपासून प्रत्येक सेकंदाला माझ्यासोबत आहात जेव्हा आनंदाचा क्षण असेल तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्यासाठी नेहमीच सर्वोत्तम गोष्टींचा वर्षाव केला आहे. तुमच्या भेटवस्तूंपासून ते तुमच्या कॉल्सपर्यंतच्या तुमच्या संदेशांपर्यंत आणि तुम्ही लोकांनी माझ्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नामुळे दरवर्षी माझा दिवस सर्वांत मोठा आणि या वर्षीचा दिवस माझ्या कायम स्मरणात राहील असे म्हणत त्यांनी ऋण व्यक्त केले. माजी आमदार तोताराम कायंदे यांचे मातृतिर्थ सिंदखेडराजा मतदारसंघांच्या विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. मतदार संघाच्या कान्याकोपऱ्यात त्यांचा मोठा कार्यकर्ता वर्ग आहे अठ्याहत्तराव्या या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित मतदारसंघातील विविध पक्षांच्या, विविध जातीधर्माच्या माणसांची सदिच्छांसाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. अभिष्टचिंतन सोहळा नव्हे हा जणू स्नेह मेळावाच असा हा सोहळा होता.
यावेळी सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, युवा नेते योगेश जाधव, भाजपचे प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे, वसंतराव मगर, अशोकराव उगलमुगले, भाजप नेते गणेश मांटे, युवराज नागरे, माऊली मुंडे,प्रल्हाद नागरे, डॉ. मुर्तुडकर, पाटीलबा आंधळे, शिवशंकर डोईफोडे, विनायकराव पडघान, सिद्धेश्वर आंधळे, किसनराव आटोळे, सोमेश इंगळे, शेख सत्तार, प्रकाश गीते, गोपाळ व्यास, इरफान अली, विकास गवई, पांडुरंग पाटील भुतेकर, गणेश राजे जाधव, श्रावण डोईफोडे, प्रवीण गीते, विजय देव उपाध्य, बबन गीते, माजी जि. प. सदस्य अशोक पडघान, राजु इंगळे, अभय चव्हाण, विठोबा वनवे, अर्जुन नागरे, डॉ. दिनकर सोनुने, माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, पि.डी. वाघ, भानुदास इलग,माजी केंद्र प्रमुख दिलीप खंडारे, हिम्मतराव सानप, ज्ञानदेवराव चपटे, रमेश मांटे, गुलाब खंडागळे,अशोक खरात
शिवसेना तालुकाप्रमुख वैभव देशमुख, अतिश तायडे, काळुसे सर, प्राध्यापक जायभाये, प्राचार्य एस. बी. जायभाये, भानुदास लव्हाळे, अशोक नागरे, नंदकिशोर शिंगणे, तुकाराम आदबने, भानुदास काटे, माणिकराव मेरत, बाजीराव नागरे, श्रीराम सांगळे, रामेश्वर कायंदे, शंकर कायंदे, गणेश डोईफोडे, प्राचार्य विजय नागरे, शिवाजी बुधवत, आप्पासाहेब बुधवत, पर्वतराव नागरे, बबन नागरे, राजेंद्र डोईफोडे, रंगनाथ घुगे, गोपाल पाझडे, लिंबाजी थीगळे, प्रा दिलीप नाईकवाड, सवडदचे सरपंच गजानन देशमुख, यासह त्यांच्या अर्धांगिनी मुक्ताबाई तोताराम कायंदे चिरंजीव डॉ. सुनील तोताराम कायंदे, शिवराज तोताराम कायंदे, डॉ. सौ. शिल्पाताई सुनील कायंदे, सौ. धनश्री शिवराज कायंदे यासह अख्खा कायंदे परिवार आवर्जून उपस्थित होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोहीत म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवराज कायंदे यांनी मानले.