देऊळगांव राजा (हॅलो बुलढाणा संतोष जाधव) वडीगोद्री येथे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाच्या विरोधात उपोषणास बसलेले प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला समर्थन म्हणून आज दि. 22 सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाच्या वतीने देऊळगाव राजा शहर दुपारी एक वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात आले. या बंदसाठी शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त सहकार्य केल्याबद्दल त्यांचे ओबीसी समाजाच्या वतीने आभार देखील मानले.शहरबंद आंदोलनामध्ये असंख्य ओबीसी बांधवांनी बस स्टॅन्ड चौकातील क्रांतीसूर्य महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकासमोर एकच पर्व ओबीसी सर्व, जय ज्योती जय क्रांती, तसेच लक्ष्मणराव हाके व नवनाथ वाघमारे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन बंदचे आंदोलन यशस्वी केले.यामध्ये माजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे,युवानेते अमोल काकड, प्रकाश खांडेभराड ,अँड. किशोर सरदार,माजी नगरसेवक अजय शिवरकर, एकनाथ सोनवणे, दीपक कायंदे, देवानंद कुटे अँड राजू मांटे,दीपक मिसाळ, सचिन मुंडे, विजय कासारे, सुनील झोरे, सचिन वाघमारे,संपादक गणेश डोके, अरविंद खांडेभराड, योगेश खार्डे शरद खरात, भीमराव चाटे, दयासिंग बावरे, राजू मांटे सर, धर्मराज हनुमंते, संजय तिडके, रवी इंगळे, भारत तायडे, प्रभाकर खांडेभराड, मंगेश तिडके, पत्रकार सुरज गुप्ता, प्रदीप वाघ, संपादक मुशीर कोटकर, सदानंद तिडके, अभय वाघ, सखाराम खांडेभराड, भरत तायडे आदींनी सहभाग नोंदवला होता.