बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले.दरम्यान क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांचे पूजन सत्यशोधक पद्धतीने डॉ. आशिष खासबागे व सौ डॉ.वर्षा खासबागे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
19 सप्टेंबर रोजी बुलढाणा येथील जयस्तंभ चौक येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांचे पूजन सत्यशोधक पद्धतीने करण्यात आले डॉ. आशिष खासबागे व सौ डॉ.वर्षा खासबागे यांच्या हस्ते सत्यशोधक विधीने कार्य पार पडले.
याप्रसंगी अभिवादना करिता महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानरे सर ,डॉ. राहुल मेहत्रे, सावता मंडळाचे अध्यक्ष के .टी. पांडव सर, श्री रमेश हुडेकर, श्री दिलीप पवार श्री. गजानन हुडेकर,श्री. त्रंबक भराड, श्री. जगदीश मानतकर श्री उबाळे. श्री सदानंद माळी,श्री सुधाकर अहेर श्री नीलकंठ, श्री. अनिल रसाळ यांनी सत्यशोधक पुजारी म्हणून कार्य केले. तसेच सत्यशोधक विचाराचे पालन करण्याचे वचन उपस्थितांकडून घेण्यात आले या अभूतपूर्व सोहळ्याकरता समाजबांधव व भगिनी तसेच महात्मा फुलेंच्या विचारांचे पाईक मोठ्या संख्येने व उत्साहाने सहभागी झाले होते.या सोहळ्यास अनंता लहासे,गणपत अहेर,श्री सुरुशे, आशिष लहासे, सौ लहासे,प्रदिप डांगे, सौ डांगे, पांडुरंग बोदडे, वैभव इंगळे, सौ इंगळे, गणेश चौधरी, सुनिल गोरे, मनोज जाधव, रमेश उबाळे उपस्थित होते.