बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल मेहकर येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड यांच्या उपस्थितीत आढावा सभा संपन्न झाली असून लाखोंच्या संख्येने पोहरादेवी येथील नंगारा म्युझियम सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन कॅबिनेट मंत्री ना. संजय राठोड यांनी केले आहे.
26 सप्टेंबर रोजी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे लोकप्रिय नेते तथा कॅबिनेट मंत्री ना. संजय भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नंगारा म्युझियमचे लोकार्पण सोहळा व श्री.संत सेवालाल महाराज यांचे सुरु असलेले मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंञी ना. अजित दादा पवार व महाराष्ट्र शासनातील अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भारतातील इतर राज्यातून सुद्धा अनेक राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गज या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला देशातून जवळपास 15 लाखापेक्षा अधिक बंजारा समाजबांधव उपस्थित राहणार असल्याचे अंदाज आहे. तरी या संदर्भात पश्चिम विदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी काल महाराष्ट्र राज्याचे बंजारा समाजाचे नेते तथा कॅबिनेट मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कृषी वैभव लाॅन, मेहकर येथे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व बंजारा समाज बांधवांची आढावा सभेचे आयोजन केले होते. या आढावा सभेत सर्व बंजारा समाज बांधवांशी संवाद साधताना ना. संजय राठोड पोहरादेवी येथे नंगारा म्युझियम लोकार्पण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. तसेच समाजाच्या विकासासाठी अविरत प्रयत्न करत राहणार असल्याचे निर्धार याप्रसंगी व्यक्त केला. बुलढाणा जिल्ह्यातून आलेल्या सर्व बंजारा समाज बांधवांनी महाराष्ट्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल यथोचित गौरव केला.यावेळी बंजारा समाजाच्या पारंपारिक वेशभूषेतील महिलांद्वारे भाऊंचे विशेष स्वागत करण्यात आले. यावेळी राजगड संस्थांचे महंत रायसिंग महाराज,टेंबुरखेड संस्थांचे महंत हिम्मत महाराज , देऊळगाव साखरशा संस्थांचे महंत रामदास महाराज,श्री संत भानुदास महाराज संस्थान मोहना चे विश्वस्त जानकिराम महाराज, समाज कल्याण सभापती अभयदादा चव्हाण, डॉ. विशाल राठोड खाजगी सचिव मंत्री मृद व जलसंधारण, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक परसराम राठोड, डॉ. प्रशांत राठोड बुलढाणा जिल्हा तांडा सुधार समिती अशासकीय सदस्य, डॉ. अनिल राठोड, जि.प.सदस्य तेजराव जाधव,राम राठोड,नारायण राठोड उपसभापती, जगाराव आडे उपसभापती, सुरेश आडे, मोतीचंद राठोड, शेषराव राठोड, विजय चव्हाण, प्रकाश राठोड, विनोद राठोड, हिरासिंग जाधव, नवल चव्हाण, संपादक अंकुश राठोड,सचिनभाऊ चव्हाण स्वीय सहाय्यक,निलेशभाऊ जाधव स्वीय सहाय्यक,स्वप्नील राठोड जनसंपर्क अधिकारी तसेच अनेक तांड्यातील सरपंच नायक व कारभारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी सुरेश चव्हाण स्वीय सहाय्यक मंत्री मृद व जलसंधारण,भारत राठोड स्वीय सहाय्यक मंञी मृद व जलसंधारण, संपादक अंकुश राठोड, संतोष चव्हाण अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, देवराव पवार वनविभाग, विजय चव्हाण व बंजारा समाजबांधवानी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन संतोष चव्हाण यांनी केले.