बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जळगाव जामोद व शेगाव पोलीस ठाणे हद्दीतील 4 सोयाबीन व तूर चोरीचे गुन्हे एलसीबीने उघड केले असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मालवाहू टाटा एस कंपनीची 200000 रुपये किंमतीची गाडी जप्त केली आहे.याप्रकरणी पाच पैकी तीन आरोपींना गजाआड करण्यात आले.
आरोपींनी जळगाव जामोद हद्दीतील आसलगाव येथे दोन वेळा बुलढाणा अर्बन गोडाऊन मधून सोयाबीन व सुपो जीनिंग जळगाव जामोद येथील गोडाऊन मधून तूर तसेच शेगाव येथून चोरी करून खामगाव येथे हा माल विक्री केला. आरोपींनी 48000 रुपये किमतीचे 24 कट्टे सोयाबीन व 70000 रुपये किमतीचे 35 कट्टे सोयाबीन 1,78500रुपये किमतीची 30 कट्टे तूर असे धान्य चोरी केले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र फिरवून आरोपी अर्जुन श्रीकृष्ण हनवते,रा. आसवंद ता संग्रामपूर , आकाश संतोष वानखेडे रा. पातूर्डा,अविनाश बाळकृष्ण मेहंगे राहणार आसवद तालुका संग्रामपूर यांना अटक करण्यात आली तरअजय मेहंगे व धम्मपाल वानखडे राहणार आसवंद हे आरोपी फरार आहेत.आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मालवाहू टाटा एस कंपनीची 200000रुपये किंमतीची गाडी जप्त केली आहे.आरोपींनी चोरलेले धान्यविक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली आहे.










