spot_img
spot_img

‘गुरुजी ही फसवणूक करणं बरं नव्हं!’ -झेडपीच्या उर्दू शाळा व्यवस्थापनाने केला विद्यार्थिनीचा बोगस प्रवेश! -मुख्याध्यापक व लिपिकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी..

मोताळा (हॅलो बुलढाणा/जावेद खान) मोताळा येथील जवाहर उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापक व लिपिकाने बोराखेडी येथील एका विद्यार्थिनीचा शाळेत अधिकृत प्रवेश नसतानाही ऑनलाइन बोगस प्रवेश दाखवून ऑफलाइन नोंद न घेता फक्त संचमान्यता पुरता फुगवठा निर्माण करून शासनासह विद्यार्थिनीचीही फसवणूक केल्याची तक्रार माध्यमिक शिक्षणाधिकारी सह ठाणेदार यांच्याकडे करण्यात आली आहे.याप्रकरणी मुख्याध्यापक व लिपिकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी ही रेटण्यात आली आहे.

बोराखेडी येथील शेख जाफर अब्दुल जब्बार यांनी तक्रारीत म्हटले आहे की,त्यांची पुतणी अल्फीया अंजुम शेख नाझीम बोराखडी येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती.मात्र तिने सन एप्रिल 2023 मध्ये इयत्ता आठवी उत्तीर्ण केल्यानंतर 2023 मध्ये आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिने इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेतला नव्हता.आता मात्र तिच्या शिक्षणासाठी होणारा खर्च करण्यासाठी मी तयार आहे. परंतुकोथळी येथील चांदबी हायस्कूल ला प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रे जमा केले असता माझ्या पुतणीचा प्रवेश जून 2023 मध्ये जवाहर उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मोताळा येथे ऑनलाइन प्रवेश असल्याचे दाखवीत आहे.मुळात पुतणी अल्फीयाचाकोणत्या शाळेत प्रवेश घेतला नसताना जवाहर उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापक व लिपिकाने तिचा ऑनलाइन बोगस प्रवेश दाखविला आहे.विशेष म्हणजे मुख्याध्यापकांना प्रवेश असेल तर दाखला मागायला गेल्यावर विद्यार्थिनीची नोंद नसल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे केवळ संच मान्यता पुरता फुगवटा निर्माण करण्यासाठी विद्यार्थिनीची ऑफलाईन नोंद न घेता आकडे वाढवून संच मान्यतासाठीच्या लाभासाठी हा केलेला प्रकार दिसतो.परंतु पुतणी अल्फीयाचे शैक्षणिक नुकसान झाले असून तिला इयत्ता नववी मध्ये कुठेही प्रवेश घेता येत नसल्याने तिची दहावी सुद्धा दूर राहिली आहे.जोपर्यंत नववी पास चा दाखला मिळत नाही तोपर्यंत पुढील शिक्षण घेता येणार नाही.त्यामुळे जवाहर उर्दू हायस्कूल शाळा प्रशासनावर नवीन कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंद करून न्याय देण्यात यावा अशी मागणी,शेख जाफर अब्दुल जब्बार यांनी माध्यमिक गटशिक्षणाधिकारी यांच्यासह ठाणेदार व संबंधितांना केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!