spot_img
spot_img

‘संसार उध्वस्त होतोय..साहेब कारवाई करा!’ -मौजे पिंपळनेर येथे वाहताहेत अवैध दारूचे लोट ! -ग्रामपंचायत सह ग्रामस्थांची दारूबंदीची मागणी!

लोणार (हॅलो बुलढाणा/संदीप मापारी) मौजे पिंपळनेर गावात खुलेआम अवैध दारू विक्री होत आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून,अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात तरूण पिढी दारूच्या आहारी जात असल्याने त्यांचे भविष्यही अंधकारमय हाेत आहे, त्यामुळे गावातील दारूविक्री बंद करण्याची कारवाई करा,अशी मागणी लोणार येथील ठाणेदारांना करण्यात आली आहे. दरम्यान आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

लोणार तालुक्यातील मौजे पिंपळनेर गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होत आहे. त्यामुळे तरूण पिढी दारूच्या आहारी जात आहेत. गावातील तरूण दरदिवशी दारू पिऊन गावात भांडण-तंटे करून शांतता भंग करीत आहेत, तसेच दारूच्या व्यसनापायी अनेक लोकांचे हसते-खेळते संसार उद्ध्वस्त झाले आहेत.सध्या गणेश उत्सव असल्याने मद्यपींचा धिंगाणा वाढला आहे.तसेच गावालगत वाईन बार असून या वाईन बार मालकाने ग्रामपंचायत ची कोणत्याही प्रकारची एनओसी न घेता अनाधिकृत लायसन्स वर बार सुरू केला आहे. अवैध दारू बंदी बाबत या संदर्भात ग्रामपंचायत ने ऑगस्ट महिन्यात ठराव घेतला आहे.परंतु दारू विक्री सुरूच असल्याने या गंभीर समस्येची सोडवणूक करावी, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशा मागणीचे निवेदन तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश दराडे यांच्यासह सरपंच, सचिव,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी आणि महिलांनी ठाणेदार यांना दिले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!