बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर शहरात आज जिल्हा पोलीस दलाने पथसंचलन करून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण आहे.सोमवारी ईद-ए-मिलाद तर मंगळवारी गणेश विसर्जन आहे. या उत्सव काळात उपद्रवींनी अशा धार्मिक कार्यक्रमात व्यत्यय निर्माण करू नये म्हणून पोलीस दल करडी नजर ठेवून आहे.दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हा पोलीस दलाने पथसंचलन करीत शक्ती प्रदर्शन केले.यावेळी पथसंचलनात उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे व इतर पोलीस अधिकारी,महिला अंमलदार,जिल्हा दंगा काबु पथक, क्यूआरटी पथक, गृह रक्षक दलाचे सैनिक सहभागी झाले होते.दरम्यान गणेश विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद च्या सण उत्सवात कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाही अशा सोशल माध्यमावरील पोस्ट व्हायरल करू नये. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केलेल्या नियमांचे पालन करावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे यांनी ध्वनिक्षेपकावरून केले.