बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नितेश राणेंनी धार्मिक तेढ निर्माण करण्याची सुपारी घेतली. नितेश राणेंच्या सभा आणि बोलण्यावर बंदी घालावी. अन्यथा तिरंगा रॅली घेऊन अजित दादांना साकडे घालणार,अशी भूमिका ‘आझाद हिंद’ चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड सतीश चंद्र रोठे यांनी घेतली आहे.
धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी नितेश राणे गरळ ओकताहेत. राजकीय पोळी भाजण्यासाठी नितेश राणेंनी सुपारी घेतलेली आहे. मुस्लिमांना मज्जीदित जाऊन मारू असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही महाराष्ट्र सरकारचा नितेश राणेंवर कोणताही अंकुश नाही. या अनुषंगाने महाराष्ट्रातला पहिला हिंदू मुस्लिम मोर्चा नितेश राणेंच्या विरोधात बुलढाण्यात निघाला. महाराष्ट्रात सर्वत्र नितेश राणेंचा निषेध होत आहे. त्यानंतरही नितेश राणे हिंदू मुस्लिम व्यवहार बंद करण्यासाठी आवाहन करत आहे. हा सरकारचा नाकर्तेपणा आहे.अजितदादा सेक्युलर आहेत त्यांनी अशा पक्षांसोबत युतीत राहावे का..? अजित दादांनी समाज मनाच्या भावना लक्षात घेऊन नितेश राणेंच्या सभांवर आणि बोलण्यावर बंदी घालावी यासाठी महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम बांधव तिरंगा रॅली घेऊन अजित दादांना साकडे घालणार आहेत. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी जाहीर केली आहे.