spot_img
spot_img

कुत्रे आडवे आले अन् विपरीत घडलं!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) समृद्धी महामार्गावर कुत्रे आडवे आल्याने अनियंत्रितटाटा नेक्सा कार बॅरिगेटला धडकून 2 जण अपघातात जखमी झाले आहे.ही घटना आज 12 सप्टेंबरला मलकापूर केंद्र फरदापुर येथील चायनल नंबर 262 मुंबई कॉरिडोर जवळ घडली.

एम एच 12 क्यू एम 78 26 क्रमांकाची टाटा नेक्सा कार नागपूर वरून छत्रपती संभाजी नगर कडे जात होती.दरम्यान चायनल नंबर 262 जवळ मुंबईकॉरिडोरवर अचानक कुत्रे आडवे आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.कार थेट बॅरिगेटला धडकून अपघात झाला.या अपघातात अमित इंगोले व अर्पित अमित इंगोले जखमी झाले आहेत.त्यांना मेहकर येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.पुणे येथील राहणारा चालक विजय ज्ञानेश्वर गलांडे सुदैवाने सुखरूप आहे.परंतु कार मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली आहे.पोलीस उपनिरीक्षक शैलेश पवार,विकास कोळी,विनोद राठोड यांनी घटनास्थळी पोहोचून बॅरिगेटला धडकलेल्या अपघातग्रस्त कारला रस्त्याच्या बाजूला करून रस्ता सुरळीत केला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!