बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी जिल्हा पोलीस दलाची सुत्रे सांभाळल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावला आहे.10 सप्टेंबरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
3 चोरट्यांना गजाआड केले.आरोपीकडून
एकूण 14710 मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,एका गुन्ह्याची उकल करण्यात आली.
शेगाव शहर पोलीस ठाण्यात अप क्रमांक- 458/2024 कलम 303(2) बिएन एस प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे,अपर पोलीस अधीक्षक
बीबी महामुनी, अशोक थोरात यांच्यामार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या यांचे आदेशाने 10 सप्टेंबर रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यातील सदर चोरीचा एक गुन्हा निष्पन्न करण्यात आला.या चोरीच्या घटनेमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली असून,नगदी 2770 रुपये व 12000 रुपये किंमतीचा एक मोबाईल फोन
असा एकूण 14710 मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्यात आली. ही कारवाई एलसीबी चे सपोनी आशिष चेचरे,एचसी एजाज खान,
पीसी अमोल शेजोळ, पीसी
अजिस परसुवाले, चालक पीसी शिवानंद हेलगे या पथकाने केली.










