spot_img
spot_img

मनमानी! बदली ठिकाणी जॉईन न होता अभियंता योगेश देशमुख पाहतात नगरपालिकेचा कारभार! -अभियंता योगेश देशमुख यांनी कोट्यावधी रुपयांचे बिल काढल्याचा आरोप! -नपाने रोखले वेतन, पण नगरपालिका महेरबान?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वरिष्ठाचा वचक राहिला नाही त्यामुळे नगरपालिकेत कर्तव्यनिष्ठाही राहिली नसून, अभियंता योगेश देशमुख मनमानी करीत असल्याचा आरोप होतोय. देशमुख हे वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश नसताना बुलढाणा नगर परिषदेचा कारभार पाहत आहेत.परिषदेने त्यांचे 30 एप्रिल नंतरचे वेतन सुद्धा रोखले आहे. त्यांचा अमरावती विभागातील 6 वर्षाचा कार्यकाळ संपलेला आहे.या अभियंतावर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धीरज अवसरमोल यांनी दिला आहे.

बुलढाणा नगर परिषदेतील अभियंता योगेश देशमुख यांचा मनमानी कारभार सुरू असून 30 एप्रिल पर्यंतची मुदत संपूनही अभियंता देशमुख बोदवड नगरपरिषद या बदलीच्या ठिकाणी अद्यापही जॉईन झाले नाही.वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश नसताना व नगरपालिकेने 30 एप्रिल नंतरचे वेतन रोखले असताना, देशमुख नगरपालिकाचा कारभार पाहत आहेत.दरम्यान त्यांनी 30 एप्रिल नंतर कोट्यावधी रुपयांची विकास बांधकामाचे बिल काढले आहे,असे धीरज अवसरमोल यांनी आरोप केला आहे.नगरपालिका देखील देशमुख यांच्यावर मेहरबान असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.धीरज अवसरमोल यांनी या अभियंता विरोधात केलेल्या तक्रारीची डेप्युटी सीओ दिगंबर साठे यांना कल्पना नाही.साठे यांना अभियंता देशमुख यांच्या बदलीबाबत विचारणा केली तर ते उडवा उडवीची उत्तरे देतात.त्यामुळे अभियंता योगेश देशमुख वर कारवाई करण्यात यावी,अन्यथा 5 ऑक्टोबर पासून मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे उपोषण करण्याचा इशारा प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष धीरज अवसरमोल यांनी दिला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!