बुलडाणा (हॅलो बुलढाणा) प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेना, अभय योजना, पी.एम.कुसूम योजना,मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना आदी योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा यासाठी पथनाट्याचे सादरीकरण तसेच दर्शनसाठी आलेल्या भाविकांना माहिती देऊन महावितरणव्दारे योजनेचा गावा-गावात जाऊन जागर करण्यात येत आहे. योजनेमुळे ग्राहकाला होणाऱ्या लाभाची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महावितरणच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी
साठी गणेशोत्सवा दरम्यान मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात विविध उपाय- योजना राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या संकल्पनेतून गणेशमंडळापुढे तसेच जिल्ह्यातील मोठी गावे, बाजारापेठा,
गर्दीच्या ठिकाणी जाऊन पथनाट्याच्या माध्यमातून जनतेला महावितरणच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत ग्राहक रूफ टॉपच्या माध्यमातून स्वत: वीज निर्मिती करत असून गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीजबिल शुन्य होते.तसेच शिल्लक वीज महावितरण विकत घेते.योजनेत सहभागी निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट तीस हजार रुपये अनुदान २ किलोवॅट पर्यंत मिळते. ३ किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी अठरा हजार रूपयाचे अनुदान मिळते. ३ किलावेंट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदानाची रक्कम अठ्ठ्यात्तर हजार आहे.वीजबिल थकविल्यामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीज ग्राहकांना अभय देणारी योजना महावितरणने लागू केली आहे. वीज ग्राहकांनी थकीत बिलाची मुद्दल रक्कम भरल्यास व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे.शिवाय मुद्दल थकबाकीची ३० टक्के रक्कम एक रकमी भरल्यास ग्राहकांनी उर्वरीत थकबाकी भरण्यासाठी सहा हप्त्याची सोय देखील या योजनेत आहेत.पी.एम.कुसूब ब योजनेत शेतकऱ्यांना सौर कृषीपंप देण्यात येणार असून अनुसूचित जाती व जमातीसाठी ९५ टक्के अनुदान आणि इतरांसाठी ९० टक्के अनुदानावर विद्युत मोटरीसह सौर कृषीपंप देण्यात येणार आहे.लाभार्थ्यांना केवळ ५ व १० टक्के लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर त्यांना ३ एच.पी.५ एच.पी.आणि ७.५ एच.पी.चे सौर कृषी पंप देण्यात येणार आहे. शासनाची महत्वाकांक्षी आणि शेतकऱ्यांचे दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून महावितरणकडून सौलार प्रक्लपाचे क्लस्टर प्रकल्प उभारून शेतीकरीता दिवसा वज देण्यात येणार आहे.