देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास घरकुल योजने परीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण योजना वरचढ ठरत आहे.लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे पडले आणि पडताहेत परंतु मोदी घरकुल आवास घरकुल योजनेचे हप्ते 5 महिन्यांपासून रखडल्याने लाभार्थ्यांनी हप्ते तात्काळ देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणात गाजावाजा करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मोदी आवास घरकुल योजना कार्यान्वित केली. मात्र प्रत्यक्षात या योजनेमुळे लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. एकीकडे सरकार लाडल्या बहिणीला आनंदी ठेवत असले तरी मोदी आवास घरकुल लाभार्थ्यांचे अख्या कुटुंबाचे स्वतःहाच्या नविन घरकुलात जाण्याचे स्वप्न भंग होत आहे. पाच महिण्याचा कालावधी उलटून देखील अद्यापही हप्ता हाथात पडला नसल्यामुळे असंख्य लाभार्थ्यांची घरकुलाची कामे अर्धवट अवस्थेत उभी आहे. आज मिळेल उद्या मिळेल या आशेने लाभार्थी बँकेचे उबाराठे ओलांडून थकले आहेत. अनेक लाभार्थ्यांनी उसणवारी करून विटा, रेती, सिमेंटसह इतर साहित्याची जुळवा जुळव करून घरकुलाचे काम पूर्ण केल्याचे वास्तव चित्र आहे.असंख्य लाभार्थ्याला वेगवेगळे हप्ते मिळाले आहे. कोणाला पहिला हप्ता, तर कोणाला दुसरा तर कोणाला तिसरा असे हप्ते प्राप्त झाले आहे. पाच महिने उलटून देखील लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता मिळत नसल्यामुळे आता चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.लाडकी बहीण योजने बरोबरचं मोदी आवास योजनेचे देखील लाभार्थ्यांचे थकीत हप्ते लवकरात लवकर मिळावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.