spot_img
spot_img

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या! -खाजगी शाळेवर करीत होते विद्याधानाचे कार्य!

चांडोळ (हॅलो बुलढाणा /सलमान नसीम अत्तार ) बुलढाणा तालुक्यातील ग्राम ईरला येथील खासगी शाळेवरील शिक्षक भागवत साहेबराव वाघ या 35 वर्षीय शिक्षकाने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.

धाड पोलीस स्टेशन अंतर्गत मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, मृतकाची आई व काका शेतात काम करत होते. तेव्हा दुपारच्या वेळेस भागवत वाघ याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. या घटनेची फिर्याद मृतकाचे काका भास्कर रंगनाथ वाघ यांनी धाड पोलिसात दिली.धाड पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा रुग्णालयात पाठविण्यात आला.धाड पोलिस स्टेशन मध्ये मर्ग दाखल केला असून घटनेचा पुढील तपास धाड ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या मार्गदर्शनाखाली चांडोळ बीट जमादार संदीप कायंदे,पोलीस हे.क. लवंगे करीत आहे. मृतक व त्यांची पत्नी हे एका खाजगी शाळेवर शिक्षक म्हणून काम करत होते. मृतकाच्या पाठीमागे पत्नी, आई, मुलगा, मुलगी असा अप्त परिवार आहे. मृतक हा सुशिक्षित असून देखील टोकाचे पाऊल का उचलले अशी चर्चा ग्रामस्थ करीत होते. मृतकाचे अतिशय शोकाकुल वातावरणात संध्याकाळी अंतिम संस्कार करण्यात आले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!