spot_img
spot_img

सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण प्रकरण भोवले! -आरोपीला ३ महिन्याच्या कारावासाची शिक्षा! -श्री. व्ही. व्ही. मुगळीकर तदर्थ जिल्हा न्यायाधीश -१, बुलडाणा यांचा न्यायनिर्णय!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अमडापर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण करणे एका आरोपीला चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी आरोपीला तीन महिन्याचा कारावास व ६,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संतोष वाकडे असे आरोपीचे नाव आहे.हा न्याय निर्णय श्री. व्ही. व्ही. मुगळीकर तदर्थ जिल्हा न्यायाधीश -१, बुलडाणा यांनी दिलाय.

१८ मे २०१७ रोजी अमडापुर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक भुषण रामराव गावंडे हे आपल्या पोलीस कर्मचा-यांसह
पोलीस कॉन्स्टेबल जारवाल यांनी दिलेल्या माहीतीवरून चिखली ते अमडापुर रोडवरील टाकरखेड मुसलमान येथे रोडवरील देवीच्या मंदीराजवळ झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी गेले होते. सदर अपघातात विनोद रामदास
गायकवाड या ईसमाचा जागीच मृत्यु झालेला असल्याकारणाने मृतकाचे नातेवाई
व गावातील ५० ते १०० लोक त्यांना मृतकाच्या प्रेताजवळ जाण्यास विरोध
करू लागले. रस्त्यावरील वाहतुकीची अडवणुक करून रोष व्यक्त करीत
होते. त्यावेळी श्री. गावंडे व इतर पोलीस कर्मचारी यांनी त्यांना समजावुन
सांगण्याचा प्रयत्न केला असता, संतोष शिवाजी वाकडे रा. मगरूळ नवघरे,पुजांजी दगडु गायकवाड, गजानन मनोहर गायकवाड, गजानन रामदास खपके,घनश्याम रामचंद्र वाघ, ज्ञानेश्वर जगन्नाथ डहाके, हनुमान माधव वाघ, राजेंद्र सुखदेव वाघ या लोकांनी पोलीसाविरूध्द वक्तव्य करून जमावास भडकवुन गावंडे व इतर कर्मचारी यांच्या सोबत वाद घालुन ते करीत असलेल्या
शासकीय कामात अडथळा निर्माण केला व आरोपी संतोष वाकडे यांने श्री.गावंडे यांच्या डोक्यावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. या परीस्थितीत सुध्दा पोलीस यंत्रनेने जमावाची समजुत काडुन मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणी कामी ग्रामीण रूग्णालय चिखली येथे रवाना केले व परीस्थिती नियंत्रणात आणली. सदर घटनेच्या अनुषंगाने श्री. गावंडे यांनी पोलीस स्टेशन अमडापुर येथे दिलेल्या तक्रारीवरून वरील नमुद आरोपींन विरूध्द भा.द.वि चे कलम ३५३, ३३२, ३४१, १४३, १४७, १४८, १४९ भा.द.वि व मुंबई
पोलीस कायदा १३५ प्रमाणे अपराध क्रमांक १२२ / २०१७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासाअंती सहा. पोलीस निरीक्षक उमेश
भोसले यांनी दोषारोप पत्र विद्यमान न्यायालयात सादर केले.सदर प्रकरणात अभियोग पक्षातर्फे फिर्यादी भुषण गावंडे पोलीस कॉन्स्टेबल इदरसिंग जारवाल,भुषण गावंडे यांना झालेल्या जखमेच्या अनुषंगाने
वैद्यकीय अधिकारी डॉ. अरूणा देशमुख व तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांचे साक्षी पुरावे नोंदविण्यात आले व ते एकमेकांशी सुसंगत असल्याकारणाने महत्वपुर्ण व विश्वासहार्य ठरले व त्या आधारे तदर्थ जिल्हा न्यायाधीश- १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्री. व्ही. व्ही. मुगळीकर साहेब यांनी आरोपी संतोष वाकडे यास भा. द. वी चे कलम ३५३ व ३३२ अंतर्गत दोषी ठरवुन आरोपीस प्रत्येकी ३ महीने सश्रम कारावास व
६,०००/- रू. दंड तसेच दंड न भरल्यास प्रत्येकी एक महीना कारावास अश्या प्रकराची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. सोनाली
सावजी देशपांडे यांनी अतिशय प्रभावीपणे, कौशल्यपूर्णपणे सरकारी पक्षाची बाजू वि. न्यायालयासमोर मांडल्याकारणाने त्याच्या आधारे व त्यांनी केलेला प्रभावी युक्तीवाद ग्राहय धरून वि न्यायालयाने आरोपीला वरील प्रमाणे शिक्षा सुनावली व इतर आरोंपीची निर्दोष मुक्तता केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!