spot_img
spot_img

कशी केली काळी कमाई? -भंडारपाल प्रकाश बोथे ‘तू तो गयो!’ -जिल्हा रुग्णालयातील कोट्यावधींच्या भ्रष्टाचार प्रकरणी होणार बडतर्फ! -विभागीय चौकशी समिती प्रमुखांच्या अहवालात गुन्हे सिद्ध!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्हा सामान्य रुग्णालय वादग्रस्त बहुचर्चित भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे रा.अकोला यांच्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणात विभागीय चौकशी समिती प्रमुखांनी दिलेल्या अहवालात नियमांचे सर्व उल्लंघन सिद्ध झालेत.पुढील कारवाई साठी आरोग्य विभागाला पत्र व्यवहार देखील करण्यात आले.त्यामुळे बोथे नोकरीतून बडतर्फ होणार असून त्यांची चल-अचल संपत्ती देखील जप्त होणार आहे.

बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील महाभ्रष्टाचारी प्रकाश नामदेव बोथे मुळ चालक, नंतर कनिष्ठ लिपीक पद मिळवून घेतलेल्या बोथेवर विभागीय चौकशी अहवालात गंभीर प्रकारचे आरोप करण्यात आले आहे.विधि कालावधी आणि शासकीय रकमेचा अपहार, खरेदी घोटाळा असे गंभीर स्वरूपाचे आरोप असल्याने या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे.प्रकाश नामदेव बोथे, कनिष्ठ लिपीक (निलंबीत) सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे कनिष्ठ लिपीक भांडारपाल पदावर दि.२४.०१.२०१९ पासुन ते १२.०१.२०२४ निलंबीत होईपर्यंत
कार्यरत असून त्यांच्याकडे सा.रु. बुलडाणा येथील भांडार विभागाचा कार्यभार असतांना तक्रारीच्या अनुषंगाने दि.२१.०९.२०२१ ते २५.०९.२०२१ तसेच नागपूर लेखा विभागाने केलेल्या लेखा परीक्षणात
दि.०७.०३.२०२२ ते ११.०३.२०२२ कालावधीत गैरहजर राहून रेकॉर्ड दाखविले नाही.अशा प्रकारे दोन वेळा गैरहजर राहुन वरीष्ठांच्या आदेशाची अवहेलना केली, शिस्तभंग केला.शासनाचे आदेश पाळले नाहीत.याचे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले आहे.सदर लेखा परीक्षणान्वये सेन्ट्रल पाईपलाईन कामामध्ये, कार्यालयीन फर्निचर, कुर्लस, इले. मोटर्स इत्यादी बेकायदेशीर खरेदी,स्थानिकरित्या छपाई काम करून घेणे, बायोमेडीकल वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम खरेदी, व्हेटीलेटर खरेदी,ऑक्सीजन कॉन्सन्टेटर स्प्रे पंपखरेदी निविदा २१९० व त्या अनुषंगाने खरेदी, मोवाईल एक्सरे युनीट खरेदी, डायलेसीस मशिन खरेदी, हाफकीन बायोफार्मासिटयुकल्स यांच्याकडून खरेदी न करणे, विहीत रक्कमेचे मुद्रांक शुल्क भरून करारनामे न करणे, खरेदी बाबतचे नस्ती व कागदपत्रे अपूर्ण उपलब्ध करून देणे, जडसंग्रह नोंदवही मध्ये सर्व जडवस्तु संग्राहात नोंदी न घेणे, भांडाराचीसहामाही व वार्षिक

पडताळणी न करणे,आदीमध्ये भांडार विभागाचा कार्यभार असतांना खरेदीमध्ये बोथेने अनियमितता केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!