बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पशुधन चोरीच्या घटना वाढीस लागल्या असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिलेल्या आदेशा नुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र फिरविले होते. दरम्यान चिखली, बुलढाणा,रायपूर, देऊळगांवराजा येथील जनावर चोरट्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने 6 गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
पशुधन चोरीच्या घटना वाढीस लागल्या असताना, एसपींच्या आदेशानुसारएलसीबी चे प्रभारी ठाणेदार अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एक पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते.
फिर्यादी जालमसिंग रामलिंग साळोख रा. चांधई ता. चिखली यांनी 7 मार्च रोजी पो.स्टे. चिखली येथे 6 मार्च रोजी रात्री गोठ्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने
02 गोऱ्हे, 01 बगार, 03 बकऱ्या एकूण 60,000 हजार रुपयांचे पशुधन चोरुन नेल्याची तक्रार दिली होती. पशुधन चोरीच्या घटना वाढीस लागल्या असताना, एसपींच्या आदेशा नुसार एलसीबी चे प्रभारी ठाणेदार अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एक पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास करुन गुन्ह्यात एका आरोपीला औरंगाबाद जिल्हा अजिंठा येथून अटक करण्यात आली आहे.
शेख ईरफान शेख ईसा वय 39 वर्षे रा. अब्दलशहा नगर, सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर असेआरोपीचे नाव आहे.आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेले जनावरे, गुन्ह्यात वापरलेली वाहने इतर मुद्देमाल हस्तगत करणे सुरु आहे.
दरम्यान पो.स्टे. चिखली अप.क्र 181/2024 कलम 461,380 भादंवि
व पो.स्टे. बुलढाणा श.अ. 615/24.303 (2) 3 (5) भा. न्या. सं.
(3) पो.स्टे. रायपूर अप.क्र. 17/2024 कलम 379 भादंवि नुसार गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.तसेच पो.स्टे. रायपूर अप.क्र. 59/2024 कलम 379 भादवि. आणि पो.स्टे. देऊळगांव राजा अप.क्र. 95/2024 क. 379 भादंवि व पो.स्टे. चिखली अप.क्र.171/2024 कलम 379 भादंवि च्या गुन्ह्यामधील फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
▪️यांनी केली कामगिरी..
श्री. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री. अशोक थोरात अपोअ. खामगांव, श्री वी. वी महामुनी अपोज. बूलढाणा यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. अशोक एन. लांडे स्था.गु.शा. बुलढाणा, सपोनि. आशिष पेवरे, पोउपनि
सचिन कानडे, पोहेकर, दिपक लेकुरवाळे, पुरुषोत्तम आधाव, एजाज खान, पोना. गणेश पाटील, पोकों, गजानन गोरले, चापोहेकरें.
समाधान टेकाळे सर्व नेमणूक- स्थागुशा बुलढाणा यांनी ही कामगिरी केली.










