बुलढाणा (हॅलो बुलढाणा) पान टपरी व मेडिकल आणि बंद दुकानांना टार्गेट करून बुलढाणा, वर्धा, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात 6 ठिकाणी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या बुलढाणा पथकाने जालना येथे बेड्या ठोकल्या आहे.
मेहकर येथे 3 सप्टेंबर रोजी आरोपी दगडूबा मुकुंदा बोर्डे वय 35 राहणार पेरजापूर तालुका भोकरदन जिल्हा जालना या चोरट्याने माया पान सेंटर दुकानाचे शटर तोडून 10,000 रुपये लंपास केले होते.दरम्यान या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास चक्र फिरवून चोरट्याला जालना येथून जेरबंद करण्यात आले. त्याने इतरही गुन्ह्यांची कबुली दिली. शेगाव आणि बुलढाणा शहरातील बंद दुकान,पान टपरी, मेडिकल दुकानात चोरी केली.नांदेड येथील एक मेडिकल स्टोअर्स,डेंटल क्लिनिक फोडून चोरी केली. हिंगोली, वर्धा, नांदेड जिल्ह्यातही त्यांनी चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सदरची कामगिरी श्री. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री. अशोक थोरात अपोअ. खामगांव, श्री बी.बी महामुनी-अपोअ.बुलढाणा यांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोनि. श्री. अशोक एन. लांडे स्था. गु.शा. बुलढाणा, PSI. प्रताप बाजड, पोहेकॉ.
शरद गिरी, दिनेश बकाले, पुरुषोत्तम आघाव, पोकॉ. गजानन गोरले स्थागुशा. बुलढाणा यांनी केली.










